मुंबई - गेल्या आठवड्याभरातल्या सततच्या मंदीनंतर मुंबई शेअर बाजारात काही झालेल्या 124 अंकांच्या वाढीमुळे काहीसे चैतन्य संचारले. बड्या कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेत गुंतवणुकदार संस्थांनी केलेल्या जोरदार खरेदीचा परिणाम बाजारात दिसून आला.
दिवसाच्या कामकाजाच्या पूर्वार्धात आधीच्या आठवड्यातील मंदीचे सावट होते, मात्र त्यानंतर खरेदीचा धडाका सुरू झाल्याने त्यात दिवसाअखेर 123.83 अंकांची वाढ होऊन तो 16,860.90 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही आज 30.05 अंकांची वाढ होऊन तो 5,012.65 अंकांवर बंद झाला.
बाजारात आज तेल आणि वायू, माहिती-तंत्रज्ञान, बँका, धातू व ऊर्जा क्षेत्राच्या समभागांना चांगली मागणी होती.