नवी दिल्ली - मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या दोषींच्या शिक्षा काही काळासाठी तहकूब करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले.
याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या अब्दुल गनी तुर्क याने या शिक्षेला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन यांच्या खंडपीठाने या शिक्षेला ही स्थगिती दिली.
तुर्क याच्यावर सेंच्युरी बाजारजवळ आरडीएक्सने भरलेली गाडी ठेवल्याचा आरोप होता. या स्फोटात 88 जण ठार तर 159 जण जखमी झाले होते.
या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला अन्य एक दोषी शेख अली शेख उमर याने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सीबीआयलाही नोटीस बजावली.