चलनवाढ आटोक्यात येण्याचा अर्थतज्ज्ञांना विश्वास
Monday, May 12, 2008 18:00 [IST]

नवी दिल्ली - देशाला भेडसावणा-या चलनवाढीची समस्या लवकरच आटोक्यात येईल, असा आशावाद व्यक्त करत यासाठी विनाकारण काळजी करु नये, असा सल्ला देशातील दोन प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. सरकारकडून चलनवाढीला आटोक्यात ठेवण्यासाठी केल्या जाणा-या उपाययोजनांचे परिणाम येत्या काही आठवड्यात दिसून येतील, असे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनी सांगितले, तर येत्या चार महिन्यात चलनवाढीचा दर पाच ते सहा टक्क्यांपर्यंत खाली येईल, असा विश्वास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी व्यक्त केला.

सरकारच्या उपाययोजनांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती काही आठवड्यात, महिन्यातच खाली येतील, त्यासाठी चिंता करण्याची गरज नाही, असे अहलुवालिया यांनी सांगितले. 26 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात चलनवाढीने विक्रमी 7.61 टक्क्यांचा आकडा गाठला आहे. त्याचबरोबर देशाच्या औद्योगिक उत्पादनातही घट झाली आहे.

येत्या तीन ते चार महिन्यात चलनवाढ सहा टक्क्यांपर्यंत खाली येईल व साडेपाच टक्क्यांपर्यंत स्थिरावेल, मात्र त्यासाठी मान्सून व इतर बाबी कशा राहतात ते महत्त्वाचे आहे, असे सी. रंगराजन म्हणाले. खनिज तेलाच्या किमतीत प्रति बॅरल 120 डॉलरपर्यंत वाढ झाली आहे, ही मात्र अत्यंत चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम