मुंबई - बॉम्बे डाईंग कंपनीच्या फलकाचे नुकसान करणा-या भारतीय विद्यार्थी संघटनेच्या पाच कार्यकर्त्यांना मुंबईतील स्थानिक न्यायालयाने आज प्रत्येकी चार हजार रुपयांच्या जामीनावर व शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मुक्त केले.
विद्याधर चव्हाण, कुणाल वाडेकर, बाळा लोकरे, नितीन कदम व सुधीर कदम अशी या कार्यकर्त्यांची नावे असून त्यांच्यावर बॉम्बे डाईंग कंपनीच्या फलकाचे नुकसान केल्याचा आरोप होता.
या पाच जणांना भोईवाडा न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 मे पर्यंत न्यायायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्यानंतर अँडव्होकेट जगदीश सावंत यांनी जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने हा अर्ज दाखल करुन घेतला व चार हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.