बिजींग - चीनला आज बसलेल्या भूकंपाच्या जबरदस्त धक्क्याने किमान 107 जण ठार झाले तर 900 हून अधिक जण गाडले गेले आहेत. चीनच्या नैऋत्येकडील भागाला हा धक्का बसला. या भूकंपानंतर सरकारने सर्व प्रकारच्या मदत आणि बचाव कार्याचे आदेश दिले असून मदतीसाठी लष्कराला पाचारण केले आहे.
चीनच्या नागरी विभागाच्या सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी देण्यात आली आहे.
चीनच्या सिचुआन परगण्याच्या वेनचुआन भागाला 7 पूर्णांक 8 रिक्टर स्केल क्षमतेचा हा धक्का बसला, अशी माहिती चीनच्या भूकंपशास्त्र विभागाने सांगितले.
भूकंपामुळे एका हायस्कूलची इमारत कोसळल्याने या शाळेतील 900 विद्यार्थी गाडले गेल्याची भीती व्यक्त सरकारी सूत्रांनी व्यक्त केली.