पाकिस्तान मुस्लीम लीगच्या मंत्र्यांचे राजीनामे
Monday, May 12, 2008 22:45 [IST]

इस्लामाबाद - राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी बडतर्फ केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती करण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ पाकिस्तानातील आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असणा-या पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ गटाने मंत्रिमंडळातील आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी पाकिस्तान मुस्लीम लीगने सरकारला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता, मात्र त्यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे पक्षाचे अध्यक्ष नवाज शरिफ यांनी सांगितले.

मंत्रिमंडळातून सर्व मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला असला तरी आपला पक्ष सरकारला तत्त्वांवर आधारित बाहेरुन पाठिंबा देत राहिल. आपल्या पक्षाची पाकिस्तानात सुरू झालेली लोकशाही प्रक्रिया विस्कळीत करण्याची इच्छा नाही, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले.


Source : T-Indiainfo

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम