मुंबई - गेल्या आठवड्यात जबरदस्त तेजीत असलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकाचा आज आठवड्याच्या कारभाराच्या पहिल्याच दिवशी तब्बल 205 अंकांनी कोसळल्याने गुंतवणुकदारांच्या मनातील उत्साहाची जागा निराशेने घेतली. दिवसाच्या सुरुवातीलाच 81 अंकांची घसरण अनुभवणा-या निर्देशांकात नंतरच्या सत्रातही घसरण होत राहिली आणि दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा त्यात 204.76 अंकांची घसरण झाली होती. दिवसभराच्या कामकाजादरम्यान निर्देशांकाने 17 हजार 123 अंकांचा निचांक गाठला होता.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही आज 53 अंकांची घसरण होऊन तो पाच हजार 104 पूर्णांक 95 अंकांवर बंद झाला.
आशियायी बाजारात सर्वच शेअर बाजारांत विक्रीचा मारा झाल्याने हॉंगकॉंग आणि सिंगापूर येथील बाजारातही घसरण झाली.