नवी दिल्ली - शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रवादी शिवसेनेने आता महाराष्ट्रातही पाऊल टाकायचा निर्णय घेतला असून पदाधिका-यांच्या आणि कार्यकारी समितीच्या 52 सदस्यांच्या नावाची घोषणा पक्षाने आज केली. ही संघटना उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा येथील हे पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रातील पदाधिका-यांची नावे त्यांनी अद्याप जाहीर केली नाहीत. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून उत्तर भारतीयांविरोधात सुरू केलेले आंदोलन हे पाकिस्तानच्या भारताला अस्थिर करण्याच्या धोरणाचाच एक भाग आहे, असा आरोप पक्षाचे अध्यक्ष जयभगवान गोयल यांनी केला आहे.
पाकिस्तानने खलिस्तानवादी चळवळीला प्रोत्साहन दिले तर ठाकरे परिवार या उत्तर भारतीयविरोधी आंदोलनाला पाठिंबा देत आहे, असे त्यांनी सांगितले. गोयल हे गेली 36 वर्षे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते.