नाशिक - ख्यातनाम इतिहासकार आणि शिवचरित्रकार शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मंगळवारी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ख्यातनाम लेखक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
मतकरी यांच्या हस्ते मंगळवारी पु.ल. देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या पुलोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी पुरंदरे यांचा गौरव करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना पुरंदरे यांनी पुलंच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझा बहुमान समजतो, असे मत व्यक्त केले.
19 ते 25 मे या काळात सायखेडकर नाट्गृहात हा महोत्सव रंगणार आहे.