मुंबई - ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज न देण्याबाबत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने प्रसृत केलेले प्रसिद्धीपत्रक मागे घेत या प्रसिद्धीपत्रकाबद्दल खेद व्यक्त केला आहे. शेतक-यांना शेतकी उपकरणांसाठी कर्ज न देण्याचा निर्णय या बँकेने जाहीर केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर त्याचा निषेध करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर बँकेने आज हे पत्रक मागे घेतले.
ट्रॅक्टर खरेदीसंदर्भात बँकेने जारी केलेल्या या पत्रकाचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यामुळे संपूर्ण देशात त्याबद्दल निषेध झाला, त्यामुळे हे पत्रक तात्काळ मागे घेत असल्याचे स्टेट बँकेचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट यांनी आज मुंबईत एका निवेदनाद्वारे सांगितले.