मुंबई - रिलायन्स समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये आणि धातू तसेच भांडवली बाजारात आलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून आले आणि निर्देशांकात अवघ्या 13 अंकांची वाढ झाली.
दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा निर्देशांकात 12.98 अंकांची वाढ होऊन तो 17 हजार 243 पूर्णांक 16 अंकांवर स्थिरावला होता.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही 12.70 अंकांची वाढ होऊन तो पाच हजार 105 अंकांवर स्थिरावला.