मुंबई इंडियन्सची घोडदौड रोखली
Wednesday, May 21, 2008 16:54 [IST]

मुंबई - शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात पंजाब इलेव्हनने मुंबई इंडियन्सचा अवघ्या एका धावेने पराभव केला. वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाब संघाने विजयासाठी ठेवलेल्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार सचिन तेंडूलकरसह सलामीवीर जयसूर्याने धडाकेबाज सुरुवात करुन दिली होती.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा कर्णधार सचिन तेंडुलकरचा निर्णय आज सपशेल अपयशी ठरला. सुरुवातीला पंजाबचा पहिला गडी झटपट बाद झाल्यानंतर मात्र मार्श आणि पोमेर्सबाक यांनी दुस-या गड्यासाठी तब्बल 133 धावांची भागीदारी केली. मार्श 81 धावांवर बाद झाला, तर पोमेर्शबाक यांने 50 चेंडूत तडाखेबंद 79 धावा केल्या.

मुंबईच्या चिटणीसला दोन तर पोलॉक व फर्नांडो यांना प्रत्येकी एक गडी बाद करता आला. पंजाबने निर्धारित 20 षटकांत चार गडी बाद 189 धावा केल्या.


Source : Agencies

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम