प्रॉडक्शन हाऊसच्या प्रमुखाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्री अटकेत
Wednesday, May 21, 2008 19:09 [IST]
मुंबई - एका टिव्ही प्रॉडक्शन हाऊसच्या क्रिएटिव्ह हेडची हत्या केल्याच्या आरोपावरुन पोलीसांनी नौदलाचा एक अधिकारी व त्याची कन्नड चित्रपट अभिनेत्री मैत्रिण अशा दोघांना आज अटक केली.
लेफ्टनंट एम.एल. जेरम मॅथ्यू व त्याची मैत्रिण मारिया मोनिका सुसयराज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर नीरज अमरनाथ ग्रोवर या सिनर्जी अँडलॅब्सच्या क्रिएटिव्ह हेडची हत्या केल्याचा आरोप आहे. मालाड येथे अभिनेत्री सुसयराजच्या घरात त्यांनी नीरजही हत्या केली असा पोलीसांचा आरोप आहे.
प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.