नवी दिल्ली - चलनवाढ हा अल्पकाळाचा चिंतेचा विषय असून येत्या काही दिवसांतच ती कमी होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. आगामी पाच वर्षात नऊ टक्के विकासदर गाठणे शक्य असल्याचेही नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केला. असोचेमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
चालू आर्थिक वर्षात आठ टक्क्यांपेक्षा अधिक विकास दर कायम राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. चलनवाढ रोखण्यासाठी सरकारकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांचे परिणाम येत्या काही काळात दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.