लातूर - एकीकडे पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग याला माफ करण्याची मागणी करायची तर दुसरीकडे अफजल गुरूला फाशी देण्याची मागणी करायची हे धोरण कितपत योग्य आहे, असे वक्तव्य करुन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. लातूर येथे बातमीदारांशी बोलत होते.
एकीकडे एकाला फाशी द्यायची मागणी करायची तर दुसरीकडे एखाद्याला माफी द्यायची मागणी करायची, याबाबत निर्णय घ्यायला कायदा सक्षम आहे, असे ते म्हणाले.
अफजल गुरूला संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झाली आहे. त्याचा माफीचा अर्ज राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. पाटील यांच्या या विधानाने मोठ्या प्रमाणावर गदारोळ निर्माण करण्याची शक्यता असून भाजपा या प्रमुख विरोधी पक्षाने पाटील हे बेजबाबदार विधाने करीत असल्याची टीका केली आहे.