नवी दिल्ली - मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने 574.2 दशलक्ष रुपयांच्या सीमाशुल्काचा भरणा न केल्याबद्दल सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी रिलायन्सच्या मालकीची दोन विमाने जप्त केली. मात्र रिलायन्स उद्योगसमूहाने मात्र आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार झालेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
ही विमाने चार्टर सेवेसाठी आयात करण्यात आली होती. त्यासाठी अवघे 10 टक्के सीमाशुल्क आकारले जाते. मात्र अंबानी समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी ही विमाने वैयक्तिक कारणासाठी वापरत असल्याचे दिसून आले. त्यासाठीचे आयातशुल्क 18 टक्के आहे. त्यामुळे ही कारवाई केल्याचे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमाशुल्क मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.