अमरावतीहून तीन नवीन रेल्वेगाड्या
Saturday, July 05, 2008 11:05 [IST]

अमरावती- अमरावती रेल्वे स्थानकातून सुटणा-या तीन नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचे आश्वासन मध्य रेल्वेने दिले आहे. रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच या गाड्या सुरू होतील, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-सुरत पॅसेंजर व अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन नवीन गाड्या सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रस्ताव असल्याचे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक सौम्या राघवन यांनी सांगितले. अमरावती, नवीन अमरावती व बडनेरा रेल्वे स्थानकांच्या तपासणीसाठी राघवन येथे आल्या असताना त्यांनी ही माहिती दिली.

अमरावतीहून निघणा-या या प्रस्तावित रेल्वेगाड्या लवकरच सुरू होणार असल्या तरी अमरावती स्थानकाच्या विकासाचे काम पूर्ण होण्यास थोडा अवधी लागेल असे राघवन म्हणाल्या.

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस सुरुवातीला आठवड्यातून दोनदा धावणार असून या गाडीला मिळणारा प्रतिसाद बघून नंतर फे-या वाढवल्या जातील, असे राघवन म्हणाल्या. अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा- सोमवार ते शुक्रवार- धावणार आहे. ही गाडी सकाळी लवकर अमरावतीहून निघेल व संध्याकाळी नागपूरहून परत निघेल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम