अणुकरारावरून युएनपीएमध्येही फूट
Saturday, July 05, 2008 13:01 [IST]

नवी दिल्ली- अणुकराराच्या मुद्दयावर केंद्र सरकारला पाठिंबा देण्याच्या समाजवादी पार्टीच्या निर्णयाशी आपल्या पक्षाचा काही संबंध नाही असे इंडियन नॅशनल लोक दल अर्थात आयएनएलडी अध्यक्ष ओम प्रकाश चौटाला यांनी स्पष्ट केल्यामुळे युएनपीए अर्थात तिस-या आघाडींत फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॉंग्रेसने समाजवादी पार्टीचा याअगोदर दोनदा अपमान केला आहे आणि आता सपा नेत्यांना तिस-यांदा अपमान करून घेण्याची इच्छा असेल तर तो त्यांचा निर्णय आहे, असे चौटाला येथे म्हणाले.

आयएनएलडीचा अणुकराराला ठाम विरोध असून या करारामुळे भारत अमेरिकेचा गुलाम होईल असे आपले म्हणणे असल्याचे चौटला म्हणाले.

जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर आली तेव्हा समाजवादी पक्षाने अपमान सहन करूनही त्यांना पाठिंबा दिला होता. ते कॉंग्रेसच्या सहकार्याने उत्तर प्रदेशात सरकारही चालवत होते, असे चौटाला यांनी नमूद केले. आता पुन्हा एकदा कॉंग्रेस समाजवादी पार्टीचा अपमान करेल, असा इशारा त्यांनी दिला.

युएनपीएच्या तीन जुलै रोजी झालेल्या बैठकीत अणुकरारावर तज्ज्ञांची मते आजमावण्याचा निर्णय झाला होता. मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी राष्ट्रपती तसेच अणुशास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटल्यानंतर मुलायम सिंग यादव व अमर सिंग अणुकरार देशहितासाठी आवश्यक असल्याचा राग आळवू लागले आहेत, असे चौटाला म्हणाले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम