अडवाणी बुश यांच्यापेक्षा घातक- अमर सिंग
Saturday, July 05, 2008 14:05 [IST]

नवी दिल्ली- समाजवादी पार्टी सेक्युलर राजकारणाशी एकनिष्ठ असून भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांचे धार्मिक राजकारण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कारवायांपेक्षा घातक असल्याचे मत समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत अद्याप काहीही निश्चित न झाल्याचे अमर सिंग यांनी स्पष्ट केले. अणुकरारावरून केंद्र सरकारला संसदेत अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागेल त्यावेळी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

युएनपीएमधील सहकारी पक्ष इंडियन नॅशनल लोक दल व तेलगू देसम पार्टी यांनी केलेल्या टीकेबाबत समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी काही बोलण्यास नकार दिला. "कॉंग्रेसने आमचा पाठिंबा मागितलेला नाही किंवा आम्हीही तो देऊ केलेला नाही," असे अमर सिंग यांनी बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केले.

डावे पक्ष अणुकराराच्या मुद्दयावरून केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या धमक्या गेले वर्षभर देत आहेत. मात्र त्यांनी अद्याप पाठिंबा काढलेला नाही याकडे अमर सिंग यांनी लक्ष वेधले.

अणुकरार राष्ट्राच्या हिताचा असल्याची ग्वाही ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी दिली असल्याचे अमर सिंग म्हणाले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम