नवी दिल्ली - अणूकरार हा भारतासाठी असून तो कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाही, असे आवाहन देशातील बड्या मशिदींत मौलवींनी केले.
भारत-अमेरिका नागरी अणूसहकार्य करार हा मुस्लीमविरोधी असल्याचा काही जणांकडून प्रचार केला जात आहे. त्याला जामा मशिदीचे मुख्य मौलवी अहमद बुखारी यांनी प्रत्युत्तर दिले. हा करार केवळ हिंदू किंवा मुस्लीमांसाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे, असे ते म्हणाले.
समाजवादी पार्टीचे सरचिटणीस अमरसिंग आणि अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांची भेट घेतल्यानंतर बुखारी बातमीदारांशी बोलत होते. त्यांनी या कराराचे स्वागतही केले आहे.