मुंबई - केंद्र सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रातील विशेषत: सधन मानल्या जाणा-या पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांना मिळाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रातील 37 लाख 60 हजार शेतक-यांनी या कर्जाचा लाभ घेतला असून त्यासाठी 77.6 अब्ज रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.
यातील सर्वाधिक शेतकरी हे पश्चिम महाराष्ट्रातील असून त्यांची संख्या 15 लाख 20 हजार आहे.