मुंबई - पश्चिम रेल्वेवरच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात उपनगरी रेल्वे प्रवाशांनी केलेल्या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलकांनी नालासोपारा रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात मोडतोड केली.
नालासोपा-याहून बसून येणा-या प्रवाशांमुळे विरारला गाडीत चढणा-या प्रवाशांना बसायला जागा मिळत नसल्याचा आरोप करीत हे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनानंतर दहिसर, मीरा रोड, भायंदर, नायगांव व वसई रोड रेल्वे स्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चर्चगेट ते वसई रोडदरम्यानची रेल्वे वाहतूक सुरू होती.