मुंबई - मुंबई शेअर बाजारातील तेजीचे सत्र आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही कायम राहिले आणि निर्देशांकात 214 अंकांची वाढ नोंदवण्यात आली.
गेल्या दोन सत्रांत एक हजार अंकांची वाढ नोंदवणा-या सेन्सेक्समध्ये आज दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा निर्देशांकात 214.64 अंकांची वाढ होऊन तो 13850 अंकांवर बंद झाला होता.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही 67.25 अंकांची वाढ होऊन तो 41,59.50 अंकांवर बंद झाला.