अलिबाग - येथील एका रसायन कारखान्यात कामगार आणि व्यवस्थापनातील चर्चा फिसकटल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुदर्शन केमिकल्स या कारखान्याबाहेर हा प्रकार घडला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी गोळीबारही करावा लागला. जमावाने केलेल्या गोळीबारात उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले.
व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील चर्चा सुरू असताना मोठ्या प्रमाणावर जमाव कारखान्याबाहेर जमला होता. चर्चा फिसकटल्यानंतर जमावाला घालवून देण्यासाठी व्यवस्थापनाने पोलीसांना बोलावल्यानंतर कामगारांनी त्याला विरोध केला.