नवी दिल्ली - विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विरोधी पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी उडाली. त्याचबरोबर विविध पक्षांनी आपापपल्या भूमिकांवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने चर्चा वादळी झाली.
आडवाणी यांनी पंतप्रधानांना व्यक्तीगत हल्ला चढवत त्यांच्यामुळेच आजची ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला. अणूकरार हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यातील प्रतिष्ठेचा मुद्दा झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपला पक्ष सत्तेत आल्यास करार रद्द करणार नाही, मात्र त्याच्यावर पुन्हा नव्याने वाटाघाटी केल्या जातील, असे स्पष्ट केले.
त्याला सत्ताधारी बाकांकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले.