'सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी समाजाचा विचार करावा'
Monday, July 28, 2008 15:29 [IST]
कुरुक्षेत्र - सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-या व्यक्तींनी आपल्या कार्याने स्वत:ला सिद्ध करावे. त्यांनी स्वत:साठी काम न करता समाजासाठी काम करावे. विशेषत: समाजातील दुर्बल घटकांप्रती त्यांची बांधिलकी असावी, असे मत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज व्यक्त केले.
हे व्यक्तीसाठीच नव्हे तर संस्थां, देश आणि विश्वासाठीही तितकेच लागू पडते, असे त्यांनी येथे आयोजित केलेल्या 44 व्या अखिल भारतीय ओरिएंटल कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले.