मुंबई - कतरिना कैफच्या वाढदिवशी शाहरुख खानसोबत घेतलेला पंगा सल्लूमियाला आता चांगलाच महाग पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या भांडणानंतर बॉलिवूडमधील हॉट कपल समजल्या जाणा-या कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्यातून आता विस्तवही जात नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे दोघेही आता आपापसांत संभाषण करीत नाहीत, असे बोलले जात आहे.
ऐश्वर्यासोबतचे संबंध संपल्यानंतर सलमानला कतरिनाच्या रुपाने चांगला जोडीदार मिळाला होता. मात्र सल्लूमियाच्या तापट स्वभावाचा तिला वारंवार फटका बसू लागला होता. त्यातच तिच्या वाढदिवशी खुद्द सलमानने आयोजित केलेल्या पार्टीत त्याचा कडेलोट झाला. सलमानने त्या पार्टीत तसे वागायला नको होते, असे कतरिनाने एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कतरिनाची महत्त्वाकांक्षाही सल्लूमियाच्या रागाला कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे. कतरिनाने कोणासोबत काम करावे, तिने कोणते कपडे घालावेत, याची आचारसंहिताच सलमानने केल्याने तिलाही त्याच्यापासून दूरच जायचे होते, असे सूत्रांनी सांगितले.