मुंबई - रिझर्व बॅंकेच्या तिमाही आढाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज 74 अंकांची किरकोळ वाढ झाली.
लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्यांच्या समभागांना जागतिक बाजारपेठेत मिळत असलेल्या उठावाचा परिणाम आज बाजारात दिसून आला. सेन्सेक्समध्ये वाढ होऊन तो 14,349 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही 20.25 अंकांची वाढ झाली. कामकाज संपले तेव्हा निफ्टी 4353 अंकांवर बंद झाला.