नवी दिल्ली - रोख राखीव प्रमाण आणि रेपो दरात आज रिझर्व बँकेने केलेल्या वाढीचा सकारात्मक परिणाम चलनवाढीला नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांपासून चलनफुगवट्य़ाला आळा घालण्यासाठी सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणूनच आजच्या उपाययोजना करण्यात आल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
रोख राखीव प्रमाणात केलेल्या वाढीमुळे बाजारपेठेतील वित्तपुरवठा नियंत्रित होईल व त्याची मागणीही कमी होईल, परिणामी चलनफुगवट्य़ाला आळा बसू शकतो, असे ते म्हणाले.