सुरत - अहमदाबाद य़ेथे झालेल्या स्फोटांना आठवडा उलटत नाहीत तोच सुरतमध्ये आज सकाळी दोन जीवंत बॉम्ब सापडले. सुरतच्या वरचा भागात हे बॉम्ब ठेवले होते.
एका दुकानावर हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. दुकान उघडत असताना त्यावर ठेवलेली पिशवी खाली पडल्यानंतर दुकानदाराने तात्काळ पोलीसांना बोलावले. त्यानंतर पोलीस पथक बॉम्बशोधक पथक तसेच बॉम्ब निकामी करणा-या पथकासह हजर झाले.
दुसरा बॉम्ब संतोषनगर परिसरात ठेवण्यात आला होता. दोन्ही बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत.