मुंबई - राज्याच्या पुरग्रस्त विभागात कोणत्याही साथीच्या आरोग्यांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य महासंचालनालयाने वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचा-यांची पथके तैनात केली आहेत. वरिष्ठ अधिका-यांनी ही माहिती दिली.
या भागात डॉक्टर तसेच निमवैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. राज्यातील सर्व रुग्णालयांत औषधे तसेच इतर आरोग्यसुविधांचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.