मुंबई - बाजारातील पतपुरवठा अधिक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या आजच्या उपाययोजनांचा परिणाम मुंबई शेअर बाजारातही दिसून आला आणि निर्देशांकात तब्बल 557 अंकांची घसरण झाली. या उपाययोजनांचा सर्वाधिक विपरित परिणाम आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बँकांवर होणार आहे.
दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा निर्देशांकात 557.57 अंकांची घसरण होऊन तो 13,791.54 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीतही 142.25 अंकांची घसरण होऊन तो 4,189.85 अंकांवर बंद झाला.