सुरत - गुजरातमध्ये साखळी बॉम्बस्फोट होऊन आठवडाही होत नाही तोच सुरतमध्ये आज एकापाठोपाठ एक असे 18 जिवंत बॉम्ब सापडले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत बॉम्बशोधक पथकं तैनात करण्यात आली असून बॉम्ब निकामी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
शहराच्या वारचा भागात सकाळी चार तासांत नऊ जिवंत बॉम्ब सापडले. ते सर्व निकामी करण्यात यश आलं. परंतु त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी हे बॉम्ब सापडतच आहेत. शहर पोलिस आयुक्तांनी नेमका आकडा अद्याप सांगितला नसला, तरी सुमारे 18 बॉम्ब सापडल्याचं वृत्त आहे.