मुंबई - कॉंग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा परिणाम म्हणूनच बंगलोर आणि अहमदाबाद येथे बॉम्बस्फोटासारख्या घटना घडल्या असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केला.
मुंबई हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले असून शहरातील अनधिकृत बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हुसकून लावण्यासाठी कोणताच प्रयत्न केला जात नाही, असे त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले. मतपेटीवर डोळा ठेऊनच कॉंग्रेस हे करीत आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी अफजल गुरूची फाशीची शिक्षा माफ करावी, अशी विनंती राष्ट्रपतींना केली असल्याची माहितीही त्यांनी बातमीदारांना दिली.