सुरत - अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सुरतला भेट दिली. कालच सुरतमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवंत बॉम्ब सापडले होते. मोदी यांच्या भेटीआधीही सुरतमध्ये एक जीवंत बॉम्ब सापडला.
मात्र बॉम्ब निकामी करणा-या पथकाने तात्काळ धाव घेऊन हा बॉम्ब निकामी केला. आज सापडलेला बॉम्ब 21 वा होता.
सुरतच्या वारचा भागात हे बॉम्ब सापडले होते, त्या भागाला मोदी यांनी आज भेट दिली.