मुंबई - बँक आणि भांडवली उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने आज पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली. कालच्या घसरणीनंतर सेन्सेक्समध्ये आज सुमारे 500 अंकांची वाढ झाली.
दिवसभराचे कामकाज संपले तेव्हा निर्देशांकात 495.67 अंकांची वाढ होऊन तो 14287.21 अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीही 123 अंकांच्या वाढीसह बंद झाला.