|
| भारतीय संघात बदल नाही - कुंबळे |
| Wednesday, July 30, 2008 17:10 [IST] |
गॅले - पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्लेला भारतीय संघच दुस-या कसोटीसाठी ठेवण्याचे संकेत भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार अनिल कुंबळे याने दिले आहेत.
उद्यापासून श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. पहिला सामना गमावणारा भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत एक-शून्य असा पिछाडीवर पडला आहे.
पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज असल्याचा दावाही त्याने केला. Source : PTI |
|
|
|

|