अहमदाबाद - अहमदाबादमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर या स्फोटांच्या सूत्रधारांना पकडण्यासाठी आज व्यापक शोधमोहिम राबवण्यात आली. शहराच्या विविध भागात राबवलेल्या या शोधमोहिमेत अनेक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
सहपोलीस आयुक्त एच. पी. सिंग यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, अंकलेश्वर भागात स्फोटके सापडल्याचा अज्ञात व्यक्तीने केलेला दूरध्वनी भरुच पोलीसांना आल्यानंतर त्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. मात्र हा दूरध्वनी म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे दिसून आले.